वैद्यकशास्त्रात नवनवीन संशोधन व तंत्रज्ञान विकसित होत आहे. अनेक समस्यांची उत्तरे मिळविण्यात यश येत आहे. पेन क्लिनिकमध्ये थिजलेला खांदा या आजारावर उपचार विना ऑपरेशन, भूल न देता केले जातात. आजच्या लेखामध्ये आपण थिजलेला खांदा आणि त्याच्या उपचार पद्धती याविषयी जाणून घेणार आहोत. थिजलेल्या खांद्याची कारणे प्रामुख्याने दोन कारणे सांगता येतील १) डायबेटिस (मधुमेह) २) हाडाची झीज (ऑस्टिओआर्थाइड).
थिजलेल्या खांद्याची लक्षणे हात वर नेण्यास वेदना होणे. केस विंचरतांना वेदना होणे, शर्ट किंवा ब्लाउज घालताना त्रास होणे, हात मागे न जाणे. बऱ्याच वेळेस शौचास बसताना त्रास जाणवणे आदी लक्षणे दिसून येतात.
रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे : खांद्याला जाणारी नस मोकळी करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीचा उपयोग होतो. यामध्ये तात्पुरत्या वेळेसाठी (साधारणतः एक ते दोन वर्षांसाठी) संवेदनाग्राहक नस वेदनारहित केली जाते. त्यामुळे खांद्याच्या वेदना कमी होतात. एकदा नसेच्या वेदना कमी झाल्या की, खांद्याचे नियमित व्यायाम करून खांदा हा नेहमीसारखा मोकळा व पूर्ववत होतो. ही प्रक्रिया मशीनद्वारे केल्याने अचूक व व्यवस्थित होते. उपचार पद्धतीचे फायदे : खांद्याला कोणत्याही प्रकारच्या चिरा देण्याची गरज पडत नाही. खांद्याला भूल देण्याची आवश्यकता नसते. अनेकदा खांद्याला भूल देऊन खांदा फिरवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, यात इतर स्नायूंना इजा होण्याची शक्यता असते. रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीनद्वारे उपचार करताना हे टाळता येते. खांद्यावरील व्यायाम मात्र फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्यानेच करावेत.
साखर कंट्रोलमध्ये ठेवणे, जड वजन उचलणे टाळावे, ज्या खांद्यावर उपचार घेत आहात, त्या खांद्यावर कूस करून झोपू नये. साइड इफेक्ट्स : रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे उपचार केल्याने कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत. स्नायूंची ताकद नॉर्मलच राहते.