सायटिका : विना ऑपरेशन उपचार

कंबरदुखीच्या महत्त्वाच्या कारणांमध्ये सायटिका हे एक मुख्य कारण आहे. सायटिका म्हणजे कंबरेच्या मणक्यात नस दाबली जाणे व नसेवर दबाव आल्यामुळे नसेच्या वेदना पायात जातात. यालाच स्लिपडिस्क किंवा लंबर स्पाँडिलिसीस असेही म्हणतात.

लक्षणे :

कंबरदुखी, कंबरेच्या वेदना पायात, पोटरीत किंवा बोटापर्यंत येणे, मुंग्या येणे, जडपणा किंवा पायात बधीरपणा येणे, तळपायाची आग होणे, चालणे कमी होणे किंवा चालता चालता बसून घ्यावे लागणे, रात्रीच्या वेळी जास्त वेदना होणे, पायात रग लागणे इत्यादी. तपासण्या अशा रुग्णांना मूळतः एक्स-रे, एमआरआय व इतर काही महत्त्वाच्या तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. या तपासण्यांमुळे नस किती प्रमाणात दबली आहे किंवा कोणत्या कारणामुळे दबली आहे हे स्पष्ट होते.

उपचार पद्धती या थेरपीमध्ये जी नस मणक्यात गादी सरकल्यामुळे दबली जाते, त्या नसेवर एका इंजेक्शनद्वारे औषध टाकले जाते. ही प्रक्रिया मशिनमध्ये बघून केली जाते. अशा अचूकरित्या औषध नसेजवळ प्रकारे काम करते व नसेची सूज कमी होते. त्यामुळे डोसचे प्रमाणही कमी होते व या औषधाचा इतर अवयवांवर परिणामही होत नाही. पेन क्लिनिकमध्ये विना टाक्याची उपचार पद्धतीद्वारे मणक्यातील सरकलेली गादी दुर्बिणीद्वारे काढली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता फक्त त्या जागेवर भूल देऊन मणक्यातील गादी काढली जाते व यात कुठल्याही प्रकारचे आतून वा बाहेरून टाके येत नाही.



फायदे :

    पूर्ण भुलेची गरज नाही२) एका दिवसात डिस्चार्ज मिळतो. ) कोणत्याही प्रकारे हाडे किंवा स्नायू यांना चिरा मारल्या जात नाही. )
  1. १) पूर्ण भुलेची गरज नाही.
  2. २) एका दिवसात डिस्चार्ज मिळतो.
  3. ३) कोणत्याही प्रकारे हाडे किंवा स्नायू यांना चिरा मारल्या जात नाही.
  4. ४) लेझरद्वारे गादीचा भाग बंद केल्यामुळे पुन्हा गादी सरकण्याची शक्यता ओपन सर्जरीपेक्षा बरीच कमी असते.

विना ऑपरेशन उपचार कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, थिजलेला खांदा, संधीवात, कॅन्सर वेदना इ. वर विना ऑपरेशन उपचार सहज शक्य आहे.