पन्नाशीनंतर गुडघेदुखीचा आजार बहुतेक नागरिकांमध्ये आढळून येतो. पुरुषांमध्ये साठीनंतर आणि महिलांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हा आजार उद्भवतो. वयोमानानुसार हाडांची झीज झाल्यामुळे गुडघेदुखी सुरू होते. अशा परिस्थितीत विना ऑपरेशन गुडघ्यातील वेदना कमी करता येतात. आमच्या पेन क्लिनिकमध्ये हाडांच्या वेदनांवर उपचार होऊ शकतो. आजच्या लेखामध्ये आपण गुडघेदुखी, त्याची कारणे व विना ऑपरेशन उपचार पद्धती जाणून घेऊ.
साधारण पन्नाशीनंतर गुडघेदुखी हा आजार अनेकांमध्ये आढळून येतो. पुरुषांमध्ये साठीनंतर स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर.
1. वयोमानानुसार होणारी झीज.
2. स्त्रियांमध्ये पाळी बंद होणे किंवा गर्भपिशवीचे ऑपरेशन झाल्यानंतर, तसेच रजोनिवृत्तीनंतर हाडांची झीज सुरू होते.
3. संघीवात, आमवात, युरिक अॅसिड किंवा गाउट हेही कारण आहे.
4. फार वेळ मांडी घालून बसणे, उकड बसणे या सवयी गुडघ्याची झीज होण्याचा वेग वाढवतात.
5. वजन जास्त असणे, स्थूलता हे सध्याच्या आधुनिक लाइफस्टाइलमुळे व फास्ट फूडमुळे महत्त्वाचे कारण.
6. गुडघ्याला मार लागणे, अपघात किंवा मुका मार यामुळे गादी फाटणे किंवा स्नायूंच्या दोऱ्या (लिगामेंट्स) तुटणे ही कारणे गुडघेदुखीला कारणीभूत ठरतात.
7. तरुण वयात होणारी झीज यासाठी कॅल्शिअम किंवा व्हिटॅमिन 'डी' जीवनसत्त्व याची कमतरता, वातानुकूलित केबिनमध्ये जास्त वेळ काम करण्याची सवय ही कारणे प्रामुख्याने दिसतात.
1. बऱ्याच रुग्णांमध्ये औषधांद्वारे वेदना कमी करता येतात व काही उपयोगी जीवनसत्त्वे दिल्याने आजार आटोक्यात ठेवता येतो; परंतु काही रुग्णांमध्ये आजार पुन्हा बळावतो, अशापरिस्थितीत विना ऑपरेशन उपचार पद्धती पेन क्लिनिकमध्ये वापरल्या जातात. याचा रुग्णास मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
2. गुडघ्यात ओझोन थेरपी करणे.
3. प्रोलोथेरपी करणे.
4. गुडघ्यात पीआरपी इंजेक्शन देणे.
5. गुडघ्यात ऑइलचे इंजेक्शन देणे.
6. रेडिओ फ्रिक्वेन्सी थेरपी.
या उपचार पद्धतीचा साइड इफेक्ट काहीही नाही व त्या आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या आहेत.